🇮🇳 महाराष्ट्र शासन | Government of Maharashtra - जिल्हाधिकारी कार्यालय, धुळे
🏛️

महाराष्ट्र शासन - महसूल व वन विभाग

जिल्हाधिकारी कार्यालय, धुळे

कोतवाल संवर्ग पदभरती प्रक्रिया - २०२६
🌿
अधिकृत भरती पोर्टल
Collector Office Dhule

मदत कक्ष व संपर्क (Help Desk & Technical Support)

कोतवाल पदभरती २०२६

तांत्रिक साहाय्य (Technical Support)

ऑनलाइन अर्ज व पेमेंट संबंधित अडचणींसाठी

ऑनलाइन अर्ज भरताना, फोटो/स्वाक्षरी किंवा कागदपत्रे अपलोड करताना अथवा पेमेंट प्रक्रियेत कोणतीही तांत्रिक अडचण आल्यास खालील अधिकृत ईमेल आयडीवर संपर्क साधावा:

केवळ फॉर्म सबमिट होत नसेल किंवा पेमेंट होत नसेल तरच मेल करावा इतर सर्व बाबींकरिता संबंधित तहसील ऑफिस किंवा उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे भेट द्यावी
govrecruitmenthelp@gmail.com

📌 टीप: ईमेल करताना उमेदवाराने आपले नाव, मोबाईल क्रमांक आणि समस्येचा स्पष्ट स्क्रीनशॉट सोबत जोडावा.

कार्यालयीन संपर्क (Office Address)

उपविभागीय निवड समिती, धुळे / शिरपूर
धुळे उपविभाग :- उपविभागीय अधिकारी कार्यालय, धुळे भाग, धुळे
पत्ता :- प्रशासकीय संकुल, धुळे - 424 001, महाराष्ट्र राज्य.
शिरपूर उपविभाग :- उपविभागीय अधिकारी कार्यालय, शिरपूर भाग, शिरपूर
पत्ता :- शिरपूर शहर पोलीस स्टेशन जवळ, शिरपूर जि.धुळे - 425 405, महाराष्ट्र राज्य.
कामकाजाची वेळ (Office Hours):
सकाळी १०:०० ते सायंकाळी ०६:०० वाजेपर्यंत
(शासकीय सुट्टीचे दिवस वगळून)
उमेदवारांसाठी अत्यंत महत्त्वाच्या सूचना
  • पेमेंट संदर्भात: बँक खात्यातून रक्कम वजा झाली असल्यास परंतु पोर्टलवर अर्ज अपूर्ण दिसत असल्यास कृपया २४ तास प्रतीक्षा करावी. घाईगडबडीत दुबार (Double) पेमेंट करू नये.
  • अर्ज पावती: अर्ज यशस्वीरीत्या सादर झाल्यानंतर 'Print' पर्यायावरून अर्जाची प्रत डाऊनलोड करून स्वतःकडे जपून ठेवावी.
  • प्रवेशपत्र (Admit Card): लेखी परीक्षा व कागदपत्र तपासणीचे प्रवेशपत्र अधिकृत पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात येईल, याबाबत उमेदवारांना वेळोवेळी पोर्टल तपासण्याचा सल्ला देण्यात येतो.
कृपया प्रतीक्षा करा...